नाशिक – शहरातील सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील ज्योती फार्माजवळ मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील जाधव संकुल परिसरातील सार्थक रहाणे, योगेश केणे आणि भावेश केणे हे तिघे मंगळवारी सकाळी दुचाकीने सातपूरकडे दहावीच्या शिकवणी वर्गाला जात असतांना ज्योती फार्माजवळ एका वाहनाचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला.
यामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात सार्थकचा मृत्यू झाला. योगेश आणि भावेश दोघेही गंभीर जखमी आहेत.जखमी दोघांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. औद्योगिक वसाहत परिसरात होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे याआधीही अपघात झाले आहेत.