अन्न व औषध प्रशासनाच्या येथील विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा एक कोटी, ९५ लाख, ८७ हजार रुपयांचा साठा जप्त केला.अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचला. संबंधित विभागाच्या पथकाने वाडीवऱ्हे परिसरात संशयित वाहनाचा पाठलाग करत गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठ्या कंटेनरांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>नाशिक : जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये बिघाड; प्रवाशांचा दोन तास खोळंबा

एका कंटेनरमधून एक कोटी, ५० लाख, ५४ हजार रुपयांचा तर, दुसऱ्या वाहनातून ४५ लाख, ३३ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण एक कोटी, ९५ लाख, ८७ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आणि अंदाजे ३० लाख रुपयांचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.