लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाकडून जिल्ह्यातील मालेगाव-मनमाड रस्त्यावर करण्यात आलेल्या धडक कारवाईत रंगयुक्त सुपारीचा ११ मालमोटारींमधील साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तीन कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ रुपये असून पहिल्यांदाच एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
mumbai, MMRCL, Mumbai Metro Rail Corporation, Colaba Bandra Seepz, Metro 3, Replant Trees 119 , out of 257, Project, environment,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या २५७ पैकी केवळ ११९ झाडांचेच पुनर्रोपण, एमएमआरसीएलचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव
slums in Dharavi
धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?
mumbai, Former BJP Corporator, Cancellation, Government's Free Membership Nominations, write letter, cm, mahalxmi race course, Willingdon Club, Royal Western India Turf Club, Prestigious club,
महालक्ष्मी रेसकोर्स आणि विलिंग्डन क्लबसाठी ५० आजीव सदस्य नामनिर्देशित करण्याचा निर्णय रद्द करा

अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मालेगाव- मनमाड रस्त्याने कर्नाटकातून दिल्ली येथे रंग लावलेल्या सुपारीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अविनाश दाभाडे यांनी वऱ्हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेल्या सुपारीची अवैध वाहतूक करणारी ११ वाहने हॉटेलमागे छुप्या पद्धतीने उभी असल्याचे आढळून आले.

आणखी वाचा-नाशिक : स्थानिक पातळीवर काँग्रेस बळकटीसाठी बैठका

सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली आणि ते लपवण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे २५० टन साठा आढळून आला. नाशिक येथील पथकालाही बोलावण्यात आले. पथकाने सुपारीचे ११ नमुने विश्लेषणासाठी घेतले. उर्वरीत २५३.३ टन साठा जप्त करण्यात आला आहे. भेसळीविरोधात अशा प्रकारची कारवाई कायमच सुरु राहील, असा इशारा अन्न व औषध विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.