नाशिक : नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नववर्षाचे स्वागत केले. शाळेतील ८५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेच्या प्रांगणात एक गोलाकार करुन दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी न चुकता नववर्षाचे स्वागत करतात. २००६ पासून हा उपक्रम सुरु आहे. नववर्ष स्वागतातून वर्षभर आरोग्य समृद्धीचा संदेश या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला.

सूर्यनमस्काराने आत्मिक, मानसिक, शारीरिक सामर्थ्य प्राप्त होत असते. या उद्दिष्टाने सूर्यनमस्काराची आवर्तने घालून नूतन वर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम विद्यालयात सलग १६ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, मनिष शाह, सनदी लेखापाल पार्थ देसाई, पितांबर सरोदे, मुख्याध्यापक सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक सीमा पाटील, भिकू त्रिवेदी, पूनम गिरी, मुख्याध्यापक मीनाक्षी भदाणे , कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. प्रशांत बागूल, लायन्स क्लब अध्यक्ष शंकर रंगलानी आदी मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा…रामकाल पथ प्रकल्पाने सिंहस्थ कामांची सुरुवात; नाशिक महापालिकेला ६५ कोटींचा निधी प्राप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी मनोगतातून आयुष्यभर योगाची साधना करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना आपल्या विकासाच्या वाटा या साधनेमुळे उज्वल करता येतील, असे त्यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची ही अभिनव संकल्पना राबवली गेल्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक सुषमा शाह यांनी प्रास्ताविकातून सूर्यनमस्काराच्या आदर्श संकल्पाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुदृढ करण्याचा हेतू असल्याचे सांगितले. सूर्यनमस्काराचा सराव क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे यांनी करून घेतला. कलाशिक्षक महेंद्र सोमवंशी, शिवाजी माळी यांनी फलक चित्रे सजावट केली. सूर्यनमस्कार पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी यांनी करवून घेतले. संगीत शिक्षक अनघा जोशी यांनी गीत संयोजन केले.