लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मध्य प्रदेशातील एका गुन्ह्यातील फरार आरोपीला गुंडा विरोधी पथकाने सातपूर येथून ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मध्य प्रदेश, गुजरातमधील लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडील फरार आरोपींना पकडण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाने सूचना पाठविण्यात आली होती.

आणखी वाचा-रावेरमध्ये संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे शरद पवार यांच्यासमोर आव्हान

संबंधित संशयित आरोपीला पकडण्यासाठी गुंडा विरोधी पथकाला आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मध्य प्रदेशातील फरार संशयित मिलिंद कांबळे हा सातपूर परिसरात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. पथकाने संशयित कांबळे याला सातपूर परिसरात सापळा रचत ताब्यात घेतले. कांबळे याला पुढील कारवाईसाठी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पथक रवाना झाले.