लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील तलाठ्यास दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.

तक्रारदाराने जमीन खरेदी केली असून त्याची सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष जोशी आणि त्र्यंबकेश्वर सजाचे कोतवाल रतन भालेराव यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या पथकाने पडताळणी करुन सापळा रचला.

हेही वाचा… नाशिक : एक कॅमेरा पोलिसांसाठी… गुन्हेगारी नियंत्रणासाठी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्विकारतांना तलाठी जोशी यास रंगेहात पकडण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.