scorecardresearch

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची चित्रे रेखाटणारा शिक्षक

यापूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले होते.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची चित्रे रेखाटणारा शिक्षक
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची चित्रे रेखाटणारा शिक्षक

जळगाव : शहरातील मानवसेवा विद्यालयातील उपक्रमशील चित्रकला शिक्षक सुनील दाभाडे यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची आकर्षक अशी चित्रे रेखाटली आहेत. त्यात महाकाली माता, सप्तशृंगी, महालक्ष्मी, रेणुका आदी देवींच्या चित्रांचा समावेश आहे.
चित्रकार दाभाडे यांनी याआधीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यापूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले होते. त्याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने घेऊन दाभाडेंचा गौरवही केला होता.

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांची अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, ही कविता चक्क तव्यावर बहिणाबाईंच्या प्रतिमेसह आकर्षक रंगात चित्रित केली होती. याआधी नवरात्रोत्सवात सुपारीवर नऊ दिवसांच्या नऊ देवींची चित्रे काढली होती. यंदाच्या नवरात्रोत्सवात त्यांनी दगडांवर देवींची चित्रे काढली आहेत. करोना आपत्ती काळातही दाभाडे यांनी शहरातील चौकाचौकांतील रस्त्यांवर करोना विरोधात जनजागृतीसाठी चित्रे काढली होती.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या