लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील पदवीच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी परीक्षांचे निकाल प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन जाहीर केले जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान करण्याच्या पद्धतीमध्ये एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने सर्व विषयांचे एकत्रित गुण मिळवून पदवी प्रदान करावी. केवळ शेवटच्या वर्षातील दोन सत्रांचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता संपूर्ण कालावधीतील सर्व सत्रांचे गुण विचारात घेतले जावेत, असे आदेश दिले होते.

हेही वाचा… नाशिकमध्ये युद्धपातळीवर छापल्या जात आहेत ५०० रुपयांच्या नोटा, पुढील चार महिन्यांत २८ कोटी नोटा छापण्याचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने ठरावही मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर करताना केली जाणार आहे. त्यामुळे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष अशा तीन वर्षांत (सहा सत्रांत) मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले.