scorecardresearch

Premium

नाशिक: मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून मुलाच्या मदतीने गळफास; नाशिक जिल्ह्यातील घटना

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे ही घटना घडली.

Dead Body in Bag
मुंबईतल्या कुर्ला भागात बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह (प्रतीकात्मक फोटो)

नाशिक: दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पतीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून पत्नी आणि मुलाने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे ही घटना घडली.

न्यायडोंगरी येथे संजय गायकवाड हा कुटुंबासह वास्तव्यास होता. संजय यास दारुचे व्यसन होते. दारु पिऊन तो पत्नी उषा आणि मुलगा अविनाश यास नेहमी मारहाण करत असे. नेहमीप्रमाणे रात्री संजय दारू पिऊन घरी आला. भांडण झाल्यानंतर त्याने पत्नीला बेदम मारहाण सुरू केली. दररोजचा त्रास सहन न होऊन पत्नीने संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. मुलगा अविनाशही मदतीला आला. दोघांनी नायलॉनच्या दोरीने गळा आवळत संजयचा खून केला. या घटनेवेळी संजयची आई मीराबाई राठोडही उपस्थित होती.

Factory owners of Kolhapur and Sangli district will pay Rs 100 from last season says Hasan Mushrif
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मागील हंगामातील १०० रुपये देणार – हसन मुश्रीफ
water scarcity nashik district drinking water 436 villages tanker
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ४३६ गाव वाड्यांना टँकरने पाणी
40 acres of sugarcane burnt down in Herwad village
कोल्हापूर: हेरवाड गावात ४० एकर ऊस जळून खाक
Leopard stay at Sherpar village in Deori taluka forest department warned people to be alert
सावधान..! देवरी तालुक्यातील शेरपार गावात बिबट्याचा मुक्काम; वनविभागाने दिला जनतेला सतर्क राहण्याचा इशारा

हेही वाचा… जळगाव: फैजपूरनजीक लाकडासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांसह पथकाने घटनास्थळी भेट देत संशयित पत्नी उषा आणि मुलगा अविनाश यांना ताब्यात घेतले. संजयची आई मीराबाई राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The wife murdered her husband with the help of son in nashik dvr

First published on: 07-10-2023 at 14:01 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×