लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : एकीककडे नाकाबंदी सुरू असतांना विना क्रमांक असलेली दुचाकी भरधाव वेगात आली आणि पोलीसांनी अडवत दुचाकी व अन्य काही चौकशी केली असता वाहनचालकाची उडालेली भंबेरी पाहता पोलीसांनी खास आपला दणका दिला. उपनगर पोलीसांच्या या दणक्यामुळे दोन विधी संघर्षित चोरट्यंकडून तब्बल सात लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले.

सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन विधीसंघर्षित मुलांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामुळे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सात लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपनगर पोलीस ठाणे तसेच नाशिक शहरातील अनेकांनी दुचाकीवरून येत चोरटे सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याची तक्रार नोंदवली होती. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या तक्रारी पाहता पोलीस आयुक्तांनी केलेल्या सुचनेनुसार उपनगर पोलीस आणि गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी करुन तपासणी मोहीम सुरु केली होती.

आणखी वाचा-आदिवासींमध्ये विदेशी शिक्षणाविषयी जागृतीसाठी ‘अल्युमनी कनेक्ट’

विनानंबर असलेली दुचाकी वाहने ताब्यात घेत सोनसाखळी चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. गुरूवारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे स्वत: तसेच गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व अन्य अधिकारी नाकाबंदीदरम्यान कार्यरत असताना एका विनानंबरच्या दुचाकीवरुन दोन जण भरधाव येताना दिसले. पोलिसांनी अडवून त्यांना त्यांच्या ताब्यातील दुचाकीविषयी माहिती विचारली असता त्यांना देता आली नाही. पोलिसांनी दुचाकीसह दोन्ही संशयितांना उपनगर पोलीस ठाण्यात आणले.

आणखी वाचा-नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी संख्येत वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत दुचाकी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे उघड झाले. म्हसरूळ परिसरातील सोनसाखळी चोरीचे सीसीटीव्ही चित्रण तपासले असता दुचाकी आणि दुचाकीस्वार यांचे वर्णन जुळल्याने पोलीसी खाक्या दाखवताच संशयितांनी चोरीची कबुली दिली. संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलीस आणि गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत सहा लाख आठ हजार ४०० रुपयांची सोन्याची लगड तसेच एक लाख १० हजार रुपयांची दुचाकी असा सात लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.