बिबट्याला पळविण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विशिष्ट प्रकारचा ध्वनी आणि लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या कार्यान्वित केलेल्या प्रणालीने दीडशे एकर घनदाट झाडी झुडपांच्या क्षेत्रातील त्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात आला आहे. या प्रणालीने बिबट्यांवर नेमका काय परिणाम होत आहे, याची पडताळणी आता खुद्द वन विभाग करणार आहे. विद्यापीठालगत वन विभागाचे क्षेत्र असल्यास त्याचा अन्य प्राणी, पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने छाननी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का; अजय बोरस्तेंसह ११ माजी नगरसेवक शिंदे गटात

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

वन्यजीव सूची एकमधील बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे. त्याच्या शिकारीस प्रतिबंध आहेच. शिवाय तो पाळताही येत नाही. शहर वा नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडताना वन विभाग देखील त्याला इजा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेते. बेशुध्द करण्यासाठी परदेशी बनावटीची बंदूक (ट्रॅक्विलायझर गन) उपलब्ध असूनही त्यांचा वापर केला जात नाही. कारण, बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन अतिशय वेगाने डागले जाते. ते कुठेही लागून बिबट्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे या कामात ब्लो पाईपचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्याद्वारे अतिशय जवळून नेम धरला जातो. त्याचा वेगही कमी असतो.

शहर व ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असूनही त्यांच्या संरक्षणासाठी दक्षता घेतली जात आहे. मुक्त विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रणालीने त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा आल्याचा सूर वन्यप्रेमींमधून उमटत आहे. गोवर्धन शिवारातील विद्यापीठाच्या दीडशे एकरच्या परिसरात ठराविक अंतरावर २१० लुकलुकणारे दिवे आणि विशिष्ट ध्वनिची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

हेही वाचा- बिबट्यावर विद्यापीठाची तंत्रमात्रा, दीडशे एकर परिसर सुरक्षित

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या प्रणालीत रात्रभर हिरव्या व लाल रंगातील दिवे लुकलुकतात. त्यावरील ध्वनिक्षेपकातून दर १० ते ३० सेकंदांच्या अंतराने विशिष्ट आवाज निघतो. गडद रंगाचा प्रकाश आणि आवाजाने मुक्त विद्यापीठ परिसर बिबट्यामुक्त झाला आहे. सीसीटीव्हीत त्याचे अस्तित्व अधोरेखीत झालेले नाही. म्हणजे या तंत्राने बिबट्याला पळवून लावण्यात महत्वाची भूमिका निभावली. विद्यापीठ परिसरातील इमारती, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व विश्रामगृह वगळता उर्वरित संपूर्ण परिसर घनदाट जंगलासारखा आहे. बिबट्यांना या ठिकाणी नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाला होता. गेल्या काही वर्षात त्याचे वारंवार होणारे दर्शन तेच दर्शवित होते.

विद्यापीठाच्या उभारलेल्या या अनोख्या प्रणालीवर लोकसत्ता – नाशिक वृत्तान्तने अलीकडेच प्रकाशझोत टाकला. ही माहिती समोर आल्यानंतर वन विभागाने या यंत्रणेची पडताळणी करण्याचे ठरवले आहे. या बाबतची माहिती वन अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. मुक्त विद्यापीठाची स्वत:ची दीडशे एकरची जागा आहे. बिबट्यापासून बचावासाठी त्यांना खबरदारी घेण्याची मुभा आहे. मात्र, त्यांच्या यंत्रणेने बिबट्याला काही दुखापत वा इजा होता कामा नये. प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन याची पडताळणी केली जाईल. विद्यापीठालगत वन विभागाचे क्षेत्र असल्यास इतर प्राणी व पक्ष्यांना आवाजाचा त्रास होऊ शकतो. तसे काहीही आढळल्यास कारवाईचा विचार वन विभाग करीत आहे. विद्यापीठातील नैसर्गिक अधिवास संपुष्टात आल्याने बिबट्यांना नवे आश्रयस्थान शोधावे लागेल. त्यामुळे आसपासच्या नागरी भागात ते जाण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा- जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन; महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोटारींच्या रांगा

फुलपाखरू उद्यानाचा अनुभव

आकर्षक रंगसंगतीमुळे सर्वांना भूरळ घालणाऱ्या फुलपाखरांची वेगळी ओळख करून देण्याच्या उद्देशाने काही वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाने आवारातच फुलपाखरू उद्यान साकारले होते. तीन हजार चौरस फूट जागेत उभारलेल्या उद्यानात तापमान विशिष्ट पातळीत सिमित रहावे, यासाठी खास व्यवस्था केली. मलाबार फ्लॅट, ओकलीफ, ब्लू कॅन्झी, ब्लू मॉर्मिनसारख्या फुलपाखरांना ठेवण्याचे नियोजन झाले. त्याकरिता त्यांचे आवडते खाद्य असणारे पेंटास, शेवंती, व्हर्बना, पॉईनफुलीया आदी फुलझाडे लावण्यात आली. फुलपाखरू शेती संकल्पनेची ओळख करून त्यावर अभ्यासक्रम सुरू करण्याचा तत्कालीन कुलगुरुंचा मानस होता. तथापि, विद्यापीठाच्या या कृतीला वन विभागाने चाप लावला होता. फुलपाखरांना बंदिस्त करण्यास प्रतिबंध आहे. मुक्त विद्यापीठाने कुठलीही परवानगी न घेता फुलपाखरू उद्यान उभारले. त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे बंदिस्त केली. हे उघड झाल्यानंतर वन विभागाने विद्यापीठाला हे उद्यान गुंडाळण्यास भाग पाडले होते.