scorecardresearch

नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Woman lured religion conversion Sinnar
धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार (प्रातिनिधिक छायाचित्र)

धर्मांतराचे प्रलोभन दाखवत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिच्या मुलांना भीक मागण्यास भाग पाडल्याचा प्रकार सिन्नर येथे उघडकीस आला. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा – भुसावळच्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लीन ;शहरवासियांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

हेही वाचा – नाशिक : अल्पवयीन मुलांना गुटखा विकणाऱ्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई

सिन्नर परिसरात कामाच्या शोधात आलेली महिला गावातील एका मंदिराजवळ मुलांसोबत राहत होती. मोलमजुरी करून कुटुंबासाठी पैसे कमवित असतांना काही जण तिच्या संपर्कात आले. त्यांनी धर्मांतराचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. यामध्ये बुट्टी, प्रेरणा, भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके, राहुल आणि एका अनोळखीचा समावेश आहे. राहुलने धर्मांतराचा बहाणा करून महिलेला गुलाबी रंगाचे पाणी पाजले असता तिला गुंगी आली. त्यानंतर संशयितांनी तिला डांबून ठेवत अत्याचार केले. मुलांना भीक मागण्यासाठी शिवीगाळ, मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:53 IST