12 November 2019

News Flash

ब्रायन लारा यांना ‘डी.वाय’ची डॉक्टरेट

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय पाटील यांच्या हस्ते ही पदावी प्रदान करण्यात आली.

नेरुळ येथे पदवीप्रदान समारंभ झाला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त शिवानी पाटील, क्रिकेटपट्ट अ‍ॅबी कुरुविल्ला, विद्यापीठाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहणार असल्याचे यावेळी लारा यांनी सांगितले. तर विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी ब्रायन लाराच्या भेटीने व त्याच्या खेळावरील प्रचंड प्रेमामुळे खेळासाठी आणखी भरीव कार्य करण्याची नवी ऊर्मी मिळाली असे सांगितले.

First Published on July 5, 2019 12:58 am

Web Title: brian lara gets d y doctorate abn 97