19 September 2020

News Flash

दिवाळीनंतरच ‘डिजिटल शाळा’

प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्वच ६०० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

६०० वर्ग सेवेत; विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी

२ ऑक्टोबरपासून नवी मुंबई महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्याचे पालिका आयुक्तांनी दिलेले आश्वासन दिवाळीनंतर प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे पालिका शाळेत शिकणाऱ्या ४२ हजार विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. प्रत्येक शाळा व वर्ग डिजिटल केला जात आहे.

महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून या खासगी शाळांमध्ये असलेल्या सर्वच सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने डिजिटल शिक्षण देण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे.

प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्वच ६०० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड बसविण्याचे काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने विलंब लागत आहे. ईआरपी सिस्टीममुळे मुले वर्गात प्रवेश केल्यानंतर त्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंद होणार आहे.

मुले शाळेत आल्यानंतर त्याची नोंद होताच त्याच्या पालकांना एसएमएसद्वारे आपले मूल शाळेत आल्याचा एसएमएसही मिळणार आहे. आवश्यक संगणक लॅब बनवण्यात आल्या आहेत. सर्व अभ्यासक्रमही डिजिटल पद्धतीचा उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील ५ वर्षांच्या कालावधीत जर अभ्यासक्रम बदलला तर बदललेला अभ्यासक्रमही डिजिटल करून देण्याचे संबंधित कंपनीला बंधनकारक आहे. एकंदरीत स्मार्ट शाळा, स्मार्ट शिक्षण, स्मार्ट विद्यार्थी घडविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत.

* विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक नोंद त्याच्या वर्गातच होणार.

* प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड.

* विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याबाबतचा एसएमएस पालकांना पाठवला जाणार.

* नवी मुंबई महापालिकेत प्राथमिक विभागात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५३ शाळा असून त्यामध्ये एकूण ५३३ कायम शिक्षक, ठोक मानधनावरील ११६ शिक्षक असून नव्याने ४८ शिक्षकांची भरती केली आहे.

* माध्यमिक विभागाच्या एकूण १८ माध्यमिक शाळा असून त्यामध्ये १७ मुख्याध्यापक, ३५ कायम शिक्षक तसेच ३१ शिक्षणसेवक व ठोक मानधनावरील ३२ शिक्षक कार्यरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:23 am

Web Title: digital school after diwali
Next Stories
1 शिवसेना मंदिरविरोधी!
2 नेरुळ-खारकोपर दिवाळीपर्यंत?
3 तळोजा एमआयडीसीत रस्त्यांची चाळण
Just Now!
X