सध्या देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, नवी मुंबईतही करोनाबाधितांची संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी नवी मुंबईत २४० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून करोनाबाधितांची एकूण संख्या १० हजार ७८६ इतकी झाली आहे.

शहरात शुक्रवारी ८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३३० वर पोहोचली आहे. शहरात आतापर्यत तब्बल ६ हजार ७३२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३ हडार ७२४ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरूवात केली आहे. बांगर यांच्यासमोर शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान असून त्यासाठी ते वेगाने कामाला लागले आहेत. नव्या आयुक्तांच्या वेगवान कामामुळे पालिका प्रशासनातील कामालाही वेग आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.