दीड दिवसात विसर्जन; गतवर्षीच्या ५९६ मंडळांची संख्या ३३३ वर

नवी मुंबई</strong> : करोनाकाळात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संख्येत गतवर्षीपेक्षा मोठय़ा प्रमाणात घट झाली. अनेक मंडळांनी सामाजिकतेचे भान ठेवत  गणेशोत्सव रद्द केला तर अनेकांनी फक्त दीड डिवसाचा गणेशोत्सव साजरा केला.  गेल्यावर्षी ५९६ सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला होता. यंदा २६३ सार्वजनिक मंडळांनी उत्सव रद्द केला. अनेक मंडळांनी फक्त दीड दिवसांचा गणशोत्सव साजरा केला.

तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने सामाजिकतेचे भान जपत फक्त दीड दिवसाचा उत्सव केला. तसेच करोनाकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख रुपयांचा निधी दिला.

घरगुती गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर केला.  नवी मुंबई शहरात शासनाच्या नवी मुंबई पोलीसांच्या आवाहनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. करोनाच्या संकटामुळे अनेक गणेश मंडळांनी उत्सव रद्द केला तर अनेक मंडळांनी फक्त दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. ३३३ सार्वजनिक मंडळापैकी २३१ मंडळांनी दीड दिवसाचाच गणेशोत्सव साजरा केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

५९६

* २०१९ सार्वजनिक गणेशोत्सव— ३३३

* २०२० सार्वजनिक गणेशोत्सव —२३१

* दीड दिवसाचा उत्सव साजरे केलेली मंडळे