जगदीश तांडेल, लोकसत्ता

उरण : जेएनपीटी बंदरातील वाढत्या व्यवसायामुळे रस्त्यांवरील वाहनांचीही संख्या वाढू असून ही कोंडी दूर करण्यासाठी सुरू असलेली रस्त्याची कामे आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जासई नाक्यावरील उड्डाण पूल लांबण्याची शक्यता असून त्यासाठीचे भूसंपादन ही मुख्य अडचण असल्याची माहीती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रशांत फेगडे यांनी दिले. त्यामुळे ही कामे २०२० पर्यंत होतीलच असे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

रस्ता रुंदीकरणाची कामे २०२० पर्यंतही पूर्ण होईल का या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. कोंडी फोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण(एनएचआय)ने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व राज्य महामार्ग क्रमांक ५४ चे रुंदीकरण करून त्याचे रूपांतरण सहा व आठ पदरी रस्त्यात करण्यात येणार आहे. तसेच हलक्या व प्रवासी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका(सव्‍‌र्हिस रोड)ही या रूंदीकरणात तयार करणात येणार आहेत. तसेच उड्डाण पूलही उभारले जात आहेत.

जेएनपीटी बंदर ते पामबीच मार्ग नवी मुंबई तसेच पळस्पे फाटा असे रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी ते पळस्पे फाटा या राष्ट्रीय महामार्गाचे आठ पदरी रस्त्यात रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा थांबा असणार नाही ई टोल आकारण्यात येणार असल्याने जेएनपीटी बंदरातून थेट पुणे गोवा या राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा रस्ता सुसाट असणार आहे. तर जेएनपीटी ते गव्हाण फाटा हा राज्य महामार्ग सहा पदरी असणार आहे. पुढील रस्त्याचे आठ पदरी रूपांतरण करण्यात येणार आहे. महामार्गावर करळ, गव्हाणफाटा, डी.पॉइंट व पळस्पे फाटा असे चार जंक्शन तयार करण्यात येणार आहेत. तर करळ, दास्तान, गव्हाणफाटा,किल्ला येथे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. रस्ता रुंदीकरण तसेच उड्डाण पुलांची कामे प्रथम २०१८,त्यानंतर २०१९ तर सध्या २०२० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातील रस्ते व उड्डाण पुलांचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.