News Flash

हॉटेल मालकांना मोकळी जागा देण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद

शहरातील हॉटेल मालकांना गाळ्यांसमोरील मोकळी जागा देण्याच्या आयुक्त दिनेश वाघमारे

शहरातील हॉटेल मालकांना गाळ्यांसमोरील मोकळी जागा देण्याच्या आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या निर्णयाचे शहरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पालिकेच्या या निर्णयाला आपण न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी म्हटले आहे. यापूर्वीही पालिकेने ही चूक केली होती. त्याला न्यायालयाने स्थागिती दिल्यानंतरही आयुक्त असे निर्णय घेत असल्याबद्दल आश्यर्य व्यक्त होत आहे.
पालिकेने हॉटेल मालकांना मोकळी जागा वापरण्याची मुभा दिल्याने विकास नियंत्रण नियमावलीची पायमल्ली होत आहे. मार्जिनल स्पेस ही आपत्तीकाळात मानवी वावर सहज व्हावा यासाठी नियमावलीत ठेवण्यात आली आहे. ती अशा प्रकारे हॉटेलमालकांच्या घशात घालणे योग्य नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
हॉटेल मालकांना रीतसर मोकळी जागा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आता दुकानदार व व्यापारी संघटनादेखील ही मागणी लावून धरणार आहेत. त्यामुळे शहरात कोठेही पाय ठेवण्यासदेखील जागा शिल्लक राहणार नाही. हॉटेल मालकांना ही मोकळी जागा मिळवून देण्यात आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. हॉटेल मालक ही मोकळी जागा बेकायदा वापरत असतील तर त्याला अधिकृत स्वरूप देऊन पालिकेच्या तिजोरीत पैसा जमा होणे कधीही योग्य असल्याचा युक्तिवाद म्हात्रे करीत आहेत.
या निर्णयाला यापूर्वीच ठाकूर यांनी न्यायालयातून स्थागिती आणली होती, मात्र न्यायालयाच्या त्या स्थागितीचा विचार न करता आयुक्त वाघमारे यांनी हॉटेलधार्जिणा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 9:34 am

Web Title: severe reactions to the decision of giveing extra spaces to hotel
Next Stories
1 ग्रामसभेच्या ठरावाला अव्हेरून बारला परवानगी
2 वाशीत पोलिसांकडूनच लूटमार!
3 अरुणाचल प्रदेश सरकारला दिलेला भूखंड सिडकोकडून रद्द
Just Now!
X