News Flash

हलगर्जी करणाऱ्या सर्वच डॉक्टरांवर कारवाई करा!

पालिका रुग्णालयातील भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे.

शिवाजी चौकात इंगळे कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत.

उपचारादरम्यान मृत्यमुखी पडलेल्या मुलाच्या पित्याची मागणी

केवळ दोन डॉक्टरांवर निलंबन कारवाई करण्याचे सोपस्कार न करता इतर पाच दोषी डॉक्टरांना निलंबित करून सर्वावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या विकी इंगळे या तरुणाच्या वडिलांनी केली आहे. दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत वाशी येथील शिवाजी चौकात दिवंगत विकीचे वडील राजेंद्र इंगळे आणि सर्व कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत. यामुळे पालिका रुग्णालयातील भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे.

नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील भोंगळ कारभाराच्या सुरस कथा अनेक वेळा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मांडलेल्या आहेत. त्याचा फटका पालिकेच्या परिवहन समिती सदस्य राजेंद्र इंगळे यांना बसला आहे. पहाटे छातीत दुखू लागल्याने त्यांनी आपला मुलगा विकी इंगळे यास वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी अ‍ॅसिडिटीमुळे छातीत दुखत असल्याचा निष्कर्ष काढून पालिकेच्या डॉक्टरांनी जुजबी उपचार केले. अ‍ॅसिडिटी असल्याचे निदान करून दोन वेगवेगळी इंजेक्शन देण्यात आली. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या या तरुणाला घसा आणि छातीत वेदना होत असल्याने चार तासाने त्याची प्राणज्योत मावळली. तरुणाच्या उपचारादरम्यान मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे जवळून जात असताना त्यांनी तरुणाच्या वडिलांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विकी इंगळे यांच्या मृत्यूस जवादे यांच्या सह वैद्यकीय अधिकारी प्रशांत वळवी, हेमंत इंगोले, डॉक्टर पंकज, आरती गनवीर, प्रभा सावंत आणि शरीफ तडवी हे सात डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विकीचे वडील राजेंद्र इंगोले यांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केली आहे.

विकीच्या उपचार अहवालात अनेक ठिकाणी फेरफार करण्यात आला असून सकाळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या सहीमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांना या प्रकरणात सत्य आढळल्याने हलगर्जीपणा करणारे दोन डॉक्टर सावंत व तडवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे इंगळे यांच्या आरोपाला बळकटी आल्याने केवळ दोन डॉक्टरांवर कारवाई करण्याचे सोपस्कर न करता विकीच्या मृत्यूस कारणीभूत असलेले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वच डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंगळे कुटुंबीयांनी केली आहे.

पालिकेतील अनेक डॉक्टर हे पालिकेतील सेवेबरोबरच खासगी दवाखाने थाटून नफा कमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. पालिका रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांवर कोटय़वधी रुपये खर्च करीत असताना मध्यंतरी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू लागल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत होती.

विकीवर योग्य ते उपचार झाले असते तर त्याचा जीव वाचला असता असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. विकीचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. त्याची सर्व तयारी करण्यात हे कुटुंब मग्न असल्याने इंगळे कुटुंबीयांना हा फार मोठा धक्का बसला आहे.

फोर्टिजची जागा ताब्यात घ्यावी

रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची तपासणी करून सदोष उपकरणे त्वरित बदलण्यात यावी तसेच पालिका रुग्णालयाच्या जागेत सुरू असलेले फोर्टिज रुग्णालयाची जागा ताब्यात घेण्यात यावी, अशा सात मागण्या या उपोषणाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

शिवाजी चौकात इंगळे कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:36 am

Web Title: take action against all the doctors who are involved in the surgery
Next Stories
1 प्लास्टिकमुक्तीचा केवळ दिखावा
2 सिडकोच्या ९० हजार घरांची प्रक्रिया रखडली
3 ‘मोरबे’त पाच महिने पुरेल एवढे पाणी
Just Now!
X