बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार अल्पसंख्याक शाळा वगळून मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशासाठी वंचित, दुर्बल आणि विशेष गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली वा पूर्व प्राथमिक वर्गात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्याुनसार २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत प्रवेशासाठीचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात १३ी25admission.maharashtra.gov.in rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावयाचे आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे.
२५ टक्के प्रवेशासाठी वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती धर्मातील विकलांग बालके तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणारे खुल्या प्रवर्गासहित विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि धार्मिक अल्पसंख्याक पात्र असतील.
ऑनलाइन प्रवेश अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अर्ज एकदाच भरला जाणार असल्याने पालकांनी रहिवासी क्षेत्रापासून १ ते ३ किलोमीटपर्यंत उपलब्ध असलेल्या शाळांचा पर्याय निवडायचा आहे.
नवी मुंबई पालिका शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रस्तरावर दहा मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहे.
त्याबाबतची माहिती rte25admission.maharashtra.gov.in.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पालकांनी अधिक माहितीसाठी ज्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या शाळेमध्ये मदत केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.