पनवेल महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पनवेलमधील विविध झोपटपट्टयांचे पुनर्वसन करीत आहे. झोपडीवासीयांप्रमाणे सामाजिक विषमता असलेल्या घटकांनाही याच गृहसंकुलामध्ये विशेष स्थान देण्यसाठी पालिका आयुक्तांनी नियोजन केले आहे. यापूर्वी पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेत कृष्टरोगीं व त्यांच्या कुटूंबियांसाठी नियोजन केल्यानंतर पालिकेने ५० तृतीयपंथींसाठी गृहसंकुलामध्ये नियोजन केले आहे. यासाठी पालिकेने तृतीयपंथींचे वास्तव्याचे सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. पनवेल पालिका झोपडपट्टी मुक्त करताना शहरातील विकासाच्या लाटेत तृतीयपंथींना त्यांचे हक्काचे घर मिळण्याच्या आशा यानिमित्ताने पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा- नवी मुंबईवर शिंदे गटाकडून आश्वासनांचा पाऊस

तृतीयपंथींच्या वास्तव्याचे सर्वेक्षण

मुंबई येथील पाठीराखा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने पनवेल पालिकेच्या आयुक्तांकडे झोपडपट्टी पुनर्वसनात येथील तृतीयपंथींसाठी घरे मिळावीत अशी मागणी केली होती. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या मागणीची गंभीर दखल घेत पालिका क्षेत्रात नेमके किती तृतीयपंथींचे वास्तव्य आहेत याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. पालिका क्षेत्रात विविध तीन टप्यात झोपडपट्टी पुनर्वसनात प्रधानमंत्री आवास योजनेतून २७०० घरांचे गृहसंकुल बांधण्यात येत आहे. पाठीराखा संस्थेने पालिका क्षेत्रात ५० तृतीयपंथी असल्याचा दावा केला आहे. या तृतीयपंथींपैकी अनेकांना राहण्यासाठी भाड्याने घरे मिळत नसल्याचे आणि अत्यल्प उत्पन्नामुळे पक्या घराऐवजी ते झोपडीत राहत असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात तृतीयपंथींची संख्या व त्यांना राहण्यासाठी घर नसल्याचे पुरावे आढळल्यास आसूडगाव येथील पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेत या तृतीयपंथीना घरे आरक्षित केली जातील असे नियोजन पालिकेत सूरु आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : झाडांच्या बचावासाठी एमआयडीसी विरोधात मुंडन आंदोलन

कृष्टरोग कुटूंबियांचाही योजनेत समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रधानमंत्री आवास योजनेतून पालिका गृहप्रकल्प उभारताना झोपडपट्टीवासीयांसोबत शहरातील इतर घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानुसार कृष्टरोग कुटूंबियांचा या योजनेत समावेश केला आहे. तृतीयपंथींयाविषयी पालिकेसमोर विषय आल्यानंतर त्याबाबत नेमके किती तृतीयपंथी पालिका क्षेत्रात राहतात याची माहिती घेण्याचे काम सूरु असल्याची माहिती पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.