नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून आतील पैशांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असले तरी अद्याप चोर पकडला गेला नाही. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बालशिवाजी व्यायाम मंडळाच्या वतीने देवी उत्सव आयोजित करण्यात आला होता.  दानपेटी फोडून चोरट्यांनी जवळपास चार हजार रुपयांची चोरी झाली आहे.दांडिया झाल्या नंतर अनेक मंडळ पदाधिकारी व भक्त याच ठिकाणी असतात. 

मात्र  १८ ऑक्टोबरला रात्री दांडियाचा कार्यक्रम झाल्यानंतर पहाटेच्या वेळी हळू हळू करीत सर्व जण आपापल्या घरी गेले.  सकाळी ६ वाजण्याच्या दानपेटी फोडून चोराने अंदाजे चार हजार रुपयांची रोकड चोरी केली . या प्रकरणी  कोपरखैरणे पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.