नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले | A police raid on a gambling den at the lodge amy 95 | Loksatta

नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले

बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे.

नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले
(संग्रहित छायाचित्र)

बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून ३४ हजराची रोकड जप्त करण्यात आली आहे. जुगार कुठेही खेळला जातो मात्र अनेकांना सुरक्षित पणे  जुगार खेळावा असे वाटते हे जरी बेकायदा असले तरी पत्ते खेळत त्यावर पैसे लावणारे सुरक्षित जागेच्या शोधात असतात यातूनच हॉटेल मध्ये सहसा दुपारी रिकामी असलेली रूम  भाड्याने घेत जुगार खेळाला जातो. अशाच चोरी छुपे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड  टाकत पोलिसांनी कारवाई केली. ज्ञानप्रकाश सिंग , विकास ठाकूर ,  नामदेव काटकर, जयनारायण यादव, मनोज भानुशाली, मोहम्मद आलम , छोटू केदार, पप्पू यादव या आरोपींच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील कार्पोरेट हॉटेल मध्ये रूम भाड्याने घेत जुगार खेळाला जात असल्या बाबत सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना हि माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सेक्टर १५ साईनगर इमारतील  कार्पोरेट हॉटेल मध्ये पथक पाठवले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : उलवे नोड शहराला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे ….

खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार पोलीस पथक थेट रूम  क्रमांक ३०६ मध्ये पोहचले. वेटर म्हणून आत प्रवेश केला मात्र दरवाजा उघडल्यावर सर्व पोलीस पथकाने आत प्रवेश केला. त्यावेळी हे सर्व आरोपी जुगार खेळात होते. तर जुगार खेळण्यासाठी सर्व सोया ज्ञानप्रकाश सिंग याने केली होती. या कारवाईत ३  पत्त्यांचे कॅट ३४ हजार ७०० रुपयांची रोकड आढळून आली. हि सर्व रक्कम जुगारात लावण्यात आलेली होती. हि रकम पट्ट्याचे कॅट पोलिसांनी जप्त केली आहेत. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पनवेल : सिडकोची मुख्य जलवाहिनी फुटल्याने तीन दिवसांपासून तीन वसाहतींमध्ये पाणीटंचाई

संबंधित बातम्या

नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात
गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
मुंबई महानगर क्षेत्रात गोवरचा उद्रेक; राज्यात दहा हजार संशयित रुग्ण