पनवेल: न्यायालयाने सुनावणी दरम्यान संशयित आरोपीला ८ डिसेंबर ही पुढील तारीख दिली. मात्र त्या संशयिताला पोलीसांच्या ताब्यात न राहता घरी जायचे होते. त्यामुळे वैतागलेल्या संशयित आरोपीने पोलिसालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता पनवेल येथील न्यायालयात पहिल्या मजल्यावर महिला वकिलांच्या कक्षाबाहेर ही घटना घडली. संशयित आरोपी संतोष याला करोनाकाळात पत्नीच्या खूना प्रकरणी अटक केली आहे. करोना संसर्गामुळे संतोषला विलगीकरणात ठेवले होते. संतापलेल्या संतोषने तिचा खून केला होता. संतोष याच्यावर पुन्हा एकदा पोलीस कर्मचा-यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा: कर्नाळा किल्ला संवर्धनाचा अहवाल वन विभागाकडे सुपूर्द

Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!

४२ वर्षीय संतोष पाटील हा संशयित आरोपीला घेऊन पोलीस कर्मचारी ओंकार ठाकरे हे पनवेल न्यायालयात आले होते. न्यायमूर्तींनी संतोषला ८ डिसेंबर ही तारीख दिल्याने पोलीस संतोषला घेऊन पहिल्यामजल्यावरुन जात असताना पहिल्या मजल्यावरील संरक्षक भिंतीजवळ आल्यावर संतोष याने तळोजा कारागृहात जाण्यापेक्षा त्याला घरी पाठवावे असा हट्ट पोलीसांसमोर केला. पोलीस व संतोष यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. संतोषने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीसांचा गणवेश सुद्धा फाडण्याचा प्रयत्न संतोषने केला. पोलीसाला जखमी केल्याने संतोषवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.