उरण : पावसाचा परतीचा प्रवास होत असताना एकीकडे विजांच्या कडकडाटासह मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू होता तर दुसरीकडे बुधवारी पहाटेच्यावेळेस धुक्याची चादर पसरू लागली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात धुक्यात हरवलेली शहरे पाहायला मिळत होती.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

पावसाच्या परतीची वेळ आणि हिवाळ्याची पहिली चाहूल म्हणजे निसर्गाच्या अद्भुत संगमाची अनुभूती असते, सध्या अशाच प्रकारची अनुभूती उरण सह रायगडकर घेत आहेत. निसर्गाने नटलेला आणि विकासाच्या दिशेकडे वाटचाल करणाऱ्या या जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अनुभवायला मिळते असताना, पहाटेच्या वेळीस मक्तर सुर्योदयासह धुक्यात हरवलेल्या गावांचा, शहरांचा नजारा पाहायला मिळत आहे. यामुळे येथील निसर्गामध्ये अधिकच भर पडत आहे. तर हा निसर्ग कायमस्वरूपी कॅमेरामध्ये बंद करण्यासाठी नागरिक देखील पहाटेपासून बाहेर पडत आहेत. त्याचप्रमाणे निसर्गाच्या अदभुत चमत्काराचा आनंदही घेत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गाने केलेली धुक्याची उधळण ही निसरर्ग प्रेमींसाठी पर्वणी असून, या निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच बदलत्या निसर्गाशी संबंधित जिवंचक्रावर होणारे प्रभाव यावर प्रत्येकाने अभ्यास करणे गरजेचे असून, यामुळे आपल्यासाठी पर्यावरणाती बदल आपल्या जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल असे मत केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक निसर्गपमित्र राजू मुंबईकर यांनी व्यक्त केले आहे.