एपीएमसी बाजारात हिरवी मिरचीची आवक कमी होत असल्याने हिरव्या मिरचीने घाऊकमध्ये प्रति किलो ६०-८० रुपये तर किरकोळ बाजारात शंभरी पार केली आहे. त्यामुळे सध्या नित्याने लागणारी मिरची सर्वसामान्यांना मात्र चांगलीच झोंबत आहे.

एपीएमसी बाजारात सुरुवातीला दर आटोक्यात होते. मात्र मागील महिन्यापासून मिरचीच्या दरात वाढ होत आहे. या आधी घाऊक बाजारात प्रतिकिलो ३०-४० रुपयांवर उपलब्ध असलेली मिरची आता ६०-८० रुपयांवर पोहचली आहे. प्रतिकिलो २०रुपयांनी भाव वधारले आहेत. ज्वाला मिरची ५०-६० रुपये तर हिरवी गडद तिखट लवंगी मिरची ८० रुपयांनी विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात सध्या दिल्ली आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची दाखल होत आहे. बाजारात मिरचीची अवघी ५०% आवक होत आहे. बुधवारी एपीएमसीत मिरचीच्या २८ गाड्या दाखल झाल्या असून १६५८ क्विंटल आवक झाली आहे. मागणीनुसार पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. घाऊक बाजरात दर वधारले असल्याने किरकोळ बाजारात देखील प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांवर विक्री होत आहे. पुढील आठवड्यात दरात घसरण होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : उच्चभ्रू वसाहतीची कंपाउंडची दगडी भिंत पडली, तीन गाड्यांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… खारघरमध्ये रस्ता खचला, काँग्रेसकडून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश , दिल्ली याठिकाणी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्या ठिकाणी आद्यप मोसमी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे उत्पादन कमी असून बाजारात अवघी ५०% आवक होत आहे. त्यामुळे मिरचीचे दर वधारले आहेत. – श्रीकांत मोहिते, व्यापारी, भाजीपाला बाजार