पनवेलमधील कामोठे येथे भाजपा नगरसेवकाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांची शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी भेट घेतली. अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जाधव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. मनसे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही त्यांनी जाधव यांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सोसायटीतील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागा मुळे भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधववर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी सकाळी अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन प्रशांत यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit thackeray meet party worker injured in attack by bjp corporator in panvel
First published on: 03-05-2019 at 17:35 IST