वसुलीसाठी तगादा; परीक्षेस बसू न देण्याची धमकी

नवी मुंबई : आतापर्यंत शैक्षणिक शुल्क घेणाऱ्या शाळांनी आता न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत संपूर्ण शालेय शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला आहे. यामुळे पालकांत संतापाची भावना असून मंगळवारी नेरुळ येथील डीएव्ही शाळेच्या पालकांनी महापालिकेत जात शिक्षण विभागाकडे आपली कैफियत मांडली.

काही दिवसांपूर्वी न्यायालयाने फक्त शिकवणी शुल्काच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेत खासगी शाळांनी आता संपूर्ण शुल्कवसुलीसाठी तगादा लावला आहे. परीक्षेला बसू देण्यात येणार नाही अशी धमकीही दिली जात आहे.

मंगळवारी सीवूड्स येथील डी.ए.व्ही. शाळेचे पालक या शुल्कवसुलीविरोधात एकवटले. त्यांनी थेट पालिका मुख्यालयात धडक दिली. शिक्षणाधिकारी नसल्याने विस्तार अधिकारी वृषाली संख्ये यांच्यासमोर त्यांनी आपली कैफियत मांडली.    सद्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. आंम्ही शालेय शुल्क देण्यास तयार आहोत. मात्र शाळा संपूर्ण शुल्क मागत आहेत. यासाठी शाळेने तगादा लावला असल्याचा आरोप पालकांनी केला. ऑनलाइन शिकवणी सुरू असतानाच विद्यार्थ्यांकडे शुल्क भरले नसल्याचे सांगितले जात आहे. याचही परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. शासनाने शिकवणी शुल्क भरण्याचे सांगितले होते. कसे बसे ते पैसै जमा करीत शाळेत भरण्यासाठी गेला असता शाळा आता ते घेत नाही. संपूर्ण शुल्क मागत असल्याचे मेघा शर्मा यांनी सांगितले. आम्ही शिष्टमंडळासह शिक्षण विभागाला भेट दिली असून या बाबत योग्य त्या कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे असे मनसे विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे यांनी सांगितले. या बाबत डीएव्ही शाळेच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सद्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. आंम्ही शालेय शुल्क देण्यास तयार आहोत. मात्र शाळा संपूर्ण शुल्क मागत आहेत. यासाठी शाळेने तगादा लावला असल्याचा आरोप पालकांनी केला. ऑनलाइन शिकवणी सुरू असतानाच विद्यार्थ्यांकडे शुल्क भरले नसल्याचे सांगितले जात आहे. याचही परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. शासनाने शिकवणी शुल्क भरण्याचे सांगितले होते. कसे बसे ते पैसै जमा करीत शाळेत भरण्यासाठी गेला असता शाळा आता ते घेत नाही. संपूर्ण शुल्क मागत असल्याचे मेघा शर्मा यांनी सांगितले. आम्ही शिष्टमंडळासह शिक्षण विभागाला भेट दिली असून या बाबत योग्य त्या कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे असे मनसे विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे यांनी सांगितले. या बाबत डीएव्ही शाळेच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

करोना टाळेबंदीत अनेकांची नोकरी गेली आहे. व्यवसाय बुडाले आहेत. पालकांची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शुल्कासाठी शाळांना तगादा लावणे योग्य नाही. अशा परिस्थितीत पैसे कमावण्याचे उद्दिष्ट ठेवणेही योग्य नाही. -योगेश पालकर, पालक

पालकांची बाजू ऐकून घेतली असून याबाबत डीएव्ही शाळेला पत्र पाठवून विचारणा करण्यात येणार आहे. तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. -ऋतिका संख्ये,विस्तार अधिकारी