नवी मुंबई : एपीएमसी बाजार आवारात अनेक घटना घडत असतात. लूटमार, चोरी, अवैध धंदे, गांजा विक्रीच्या घटनाही घडतात. एपीएमसी फळ बाजारात ६३ सीसीटीव्ही आहेत, मात्र यातील बहुतांश सीसीटीव्ही बंदच आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

एपीएमसीची आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. मात्र ही बाजार समिती सीसीटीव्हीविना सुरक्षेत मागे राहिली आहे. प्रत्येक बाजारात सुरक्षा रक्षक तेसच व्यापारी असोसिएशनच्या अंतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत.

हेही वाचा…२१ तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल; उरण फाटा, नेरुळ, सीबीडी,एपीएमसी पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई

एपीएमसीकडून काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. फळ बाजारात ६३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र त्यातील सर्वाधिक सीसीटीव्ही बंद आहेत. भाजीपाला बाजारात ५६ तर फळ बाजारात ६३ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र या १७० एकरवर वसलेल्या एपीएमसीला अधिक सुरक्षेची गरज आहे.

फळ, धान्य, भाजीपाला, मसाला, कांदा-बटाटा असे सगळे बाजार एकाच आवारात सुरू झाले. या बाजारात दरोरोज जवळपास सहा हजार गाड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रतीचा माल असतो. या बाजाराच्या आवारात ३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे, ४ मोठे लिलाव हॉल, ५ मोठे घाऊक मार्केट यार्ड आहेत. दोन ते तीन वर्षांपूर्वी खासदार निधीतून बाजारात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र काही चालू तर काही बंद तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच नाहीत.

हेही वाचा…उरणला जोडणाऱ्या जलमार्गाची कामे कधी पूर्ण होणार? सेवा सुरू होण्यापूर्वीच करंजा जेट्टीची दुरवस्था

अशी अवस्था आहे. फळ बाजारात चोरीच्या घटना घडतच असतात. तर काही वर्षांपूर्वी फळ बाजारात वैयक्तिक वादातून एका व्यक्तीने वाहन स्फोटक व ज्वलनशील पदार्थ ठेवून स्फोट घडवून आणला होता. मसाला बाजाराच्या आवाराबाहेर मोठ्या गटारात एक अज्ञात मृत इसमाचा सांगाडा निदर्शनास आला. अशा घटना बाजार परिसरात घडत असून त्याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे बाजारातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार ही आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज शेकडो ट्रक, टेम्पोंमधून मोठ्या प्रमाणावर शेतमाल आणि नागरिकांची वर्दळ या विस्तीर्ण परिसरात असते.

हेही वाचा…अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास मंदगतीने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएमसीमधील बहुतांश सीसीटीव्ही बंद आहेत. ही सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी सचिवांना अवगत करण्यात आले आहे. – संजय पिंपळे, व्यापारी, फळ बाजार