बुलेट ट्रेनच्या वेगाने राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातल्या गेल्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या मेळाव्यात आक्षेपार्ह विधान केल्याने खासदार अरविंद सावंत यांना चौकशीसाठी एन आर आय पोलिसांनी नोटीस बजावली होती. यासाठीच आज (सोमवारी) सावंत पोलीस ठाण्यात आले होते.

हेही वाचा- नवी मुंबई: पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्यांचा पाऊस

गुजरात पॅटर्नप्रमाणे अनेक पॅटर्न आहेत. लोकांच्या कंपन्या पळवा. आमच्या राज्यातल सगळं दुसरीकडे पळवून न्या हा एक नवा पॅटर्न आलाय. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या बुलेट ट्रेनच्या वेगाने कारखाने पळाले असे कधी घडले नव्हते प्रतिकार केला पाहिजे. महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट की इतकं लाचार सरकार महाराष्ट्राने कधी पाहिल नाही, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळी विमान उडवत गाजर दाखवत निषेध आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात येथे नुकतीच पूल तुटून झालेल्या दुर्घटनेचा ही त्यांनीं उल्लेख केला. अशी दुर्घटना महाराष्ट्रात झाले असतील तर महाविकास आघाडी सरकारनेच हा पूल बांधला आहे अशी टीका करण्यात आली असती. असे ते म्हणाले.नशीब तिथे आम्ही पूल बांधायला नव्हतो गडकरींनी याची गंभीर दखल घ्यावी असे सुचवलेही. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात असे छाती फुगवून सांगितले होते की वेदांता चा प्रकल्प आम्ही आणतो आहोत आता छातीवर झेंडा लावून प्रकल्प तिकडे घेऊन गेलेत.मध्यंतरी बोर्ड लावला होता आमच्या सरकार आलं आणि हिंदूंच्या सणांवरचं विघ्न गेलं आता तुमचं सरकार आलंय लग्नाची रांग सुरू झालेली आहे अशी टिका सावंत यांनी केली. यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, सी उड शाखा प्रमुख समीर बागवान आदी स्थानिक नेते उपस्थित होते.