नवी मुंबई : बीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन वाशीत भारवले असून आज त्याचे उद्धाटन पार पडले. मात्र याठिकाणी एकही विकासकाने मराठी पाटी लावली नव्हती. ही महिती महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला लागताच येथील आंदोलक धडकले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने फार मोठे आंदोलन न करता विकासक आणि मनसे यांच्यातील चर्चेत मराठी पाट्या लावण्याचे आश्वासन देण्यात आले. 

शहरातील सर्व खाजगी आस्थापना दुकाने आदींना पाट्या मराठीतूनच लावण्यात याव्या यासाठी मनपाने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीही मराठी पाट्या अनेक ठिकाणी न झळकल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी सरचिटणीस विनोद पाखरे, शहर संघटक इस्माईल शेख, सचिव व्यापारी सेना जोगेंद्र जयस्वाल, उपशाखा अध्यक्ष शिवकुमार केवट तसेच अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली

हेही वाचा – पनवेल : सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची एक लाख ४७ हजारांची फसवणूक

हेही वाचा – उरण : द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त

आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषाबाजी केली व मराठी पाट्या लावल्याशिवाय विद्युत रोषणाई सुरु न करण्याचा आग्रह धरला. यावेळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी आंदोलकांना तंबी दिल्यावर विकासक आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बोलाचाली झाल्या त्यात विकासकांनी लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्यात येईल असे आश्वासन दिले व आंदोलन थांबले.