उरण : सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या सिडकोच्या नव्या वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून घरे घेतलेल्या नागरिकांना टॅंकरचे पाणी घ्यावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही समस्या दूर झाली असून शुक्रवारपासून प्रेशरने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – पनवेल : सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची एक लाख ४७ हजारांची फसवणूक

हेही वाचा – नवी मुंबई : वंडर्स पार्कमधील प्रवेश महाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरणच्या बोकडवीरा, फुंडे व नवघर या परिसरात सिडकोच्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. या वसाहतीमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र अनेकदा या वसाहतीत कमी दाबाने पाणी येत असल्याने उंच इमारतीत पाणी येत नाही. ही समस्या कायमस्वरुपी असून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत द्रोणागिरीमधील रहिवासी राकेश म्हात्रे यांनी व्यक्त केले. तर कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यात आली असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.