महिनाभराचा सराव वाया गेल्याची भावना

२० फुटांहून अधिक उंचीचे मानवी थर न लावण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने यंदा नवी मुंबईतील दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या काही आयोजकांनी दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी सानपाडा येथील किरण तालेकारी गोविंदाचा सराव करताना थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरात अनेक मानाच्या हंडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा सर्वोच्च न्यायालयाने गोविंदा पथकांच्या मानवी थरांच्या उंचीवर मर्यादा घातल्याने काही आयोजकांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत काही गोविंदांनी नाराजी व्यक्त केली. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ऐरोली आयोजक रमाकांत म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही आदर करतो. आम्ही दहीहंडी रद्द केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऐरोलीतील अनंत प्रतिष्ठान दहीहंडीचे आयोजक अनंत सुतार यांनीही दहीहंडी उत्सव मानवी मनोरे रचून साजरा केला जाणार नसल्याचे सांगितले. लोकमान्य टिळक सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजक नामदेव भगत यांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येईल असे स्पष्ट केले. करण मित्र मंडळांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे.  या वेळी विजय चौगुलै यांच्या हंडीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

गोविंदा पथकांचा हिरमोडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल : दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात येणारे मानवी मनोरे हे २० फुटांहून जास्त नको. दहीहंडीसाठी चारच थर लावावेत. मानवी थरांमध्ये लहान मुलांचा समावेश असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केल्याने महिनाभरापासून सराव करणाऱ्या गोविंदा पथकांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. महिनाभरापूर्वी न्यायालयाने हा निर्णय दिला असता तर सरावच केला नसता, अशी प्रतिक्रिया या गोविंदा पथकांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवले. त्यामुळे यंदाही दहीहंडीच्या आयोजक व हंडीसाठी थर रचणाऱ्या गोविंदा पथकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.    मागील वर्षांपासून उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सव नियमात साजरे करण्याचे निर्देश दिल्याने पनवेल परिसरातील गोविंदा पथकांचा हिरमोड झाला. उंचउंच थरांच्या दहीहंडय़ा लावून पाच आकडी रोख रकमेची बक्षिसे आयोजक पनवेलमध्ये लावत होते.

दहीहंडी उत्सवांचा राजकीय नेत्याकडून खेळ केला जात होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे स्वागत सार्वजनिक उत्सव मंडळांनी करून धार्मिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला पाहिजे.

– अंबादास सानप, नागरिक