नवी मुंबईतील भाजपच्या चार नगरसेवकांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात गणेश नाईक यांचे खंदे समर्थक तुर्भे स्टोअर्समधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे. या चौघांनीही काही दिवसांपूर्वी राजीनामे दिले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी लागली तेव्हाच त्यांची दिशा स्पष्ट होती. सुरेश कुलकर्णी यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2020 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत
गणेश नाईक यांचे खंदे समर्थक तुर्भे स्टोअर्समधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-02-2020 at 01:02 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp four corporators join shiv sena in navi mumbai abn