नवी मुंबई: शेती उत्पादनात गुंतवणूक करा महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत…. अशी आकर्षक जाहिरात करत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जाची छाननी करत संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एपीएमसी पोलीस तपास करीत आहेत. 

नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव सचिन भिसे असे यातील आरोपींची नावे असून या पैकी मुख्य आरोपी पार्टे, व अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकाचा शोध सुरु आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यांपूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे.

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक

हेही वाचा : नवी मुंबई ही भविष्यातील जागतिक क्रीडानगरी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांचे प्रतिपादन

नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम हि फर्म करते असे सर्वत्र भासवले जात होते. या शिवाय पार्टे हा  लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालकही आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो, त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा . जेवढी गुंतवणूक त्याच्या पाच टक्के दर महिन्यात परतावा मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी मिळणार असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते.

हेही वाचा : नवी मुंबई : चिमुरडीच्या अपहरणप्रकरणी एकास अटक, एक फरार

हा व्यवहार पारदर्शक आहे हे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉजिट बॉण्ड गुंतवणूक दारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरु होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतो. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अनेकांना पटली . अखेर याबाबत काही दिवसांपूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूकदाराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथक नेमले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक दामले, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांच्या सह पथकाने अगोदर सर्व प्रकराची शहानिशा केली. याबाबत आरोपींना गाफील ठेवण्यात आले. आणि सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर कारवाईसाठी सर्व कागदपत्रे जमा होताच गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.