गणेश चतुथीच्या मुर्हतावर सिडकोने विक्रीसाठी जाहीर केलेल्या चार हजार १५८ घरे ही तळोजा, खारघर, कळंबोली आणि द्रोणागिरी या सिडकोच्या विकसित क्षेत्रात असल्याने याच परिसरात सध्या सुरु असलेल्या खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे स्वस्त असल्याचे आढळून आले आहे. पाच ते दहा लाखापेक्षा जास्त किमंतीचा फरक या दोन घरांमध्ये दिसून येत आहे. गुंतवणूक म्हणून या घरांचा पर्याय उपलब्ध केल्यास भविष्यात या घरांच्या किमंती दहा ते पंधरा लाख रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचा वीस ते तीस लाख रुपये एका घरावर फायदा होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे विमानतळ, रेल्वे, मेट्रो या सिडको प्रकल्पांवर खासगी विकासक घरांची विक्री करीत आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबईत १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना १०० टक्के लसीकरण कधी ? ; ४७,४५९ पैकी ४७,१४४ मुलांना पहिली लसमात्रा मिळाली

10 percent increase in prices of fruits vegetables prices of leafy vegetables stable
फळभाज्यांच्या दरात १० टक्के वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

सिडकोने एक लाखापेक्षा जास्त घरे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील पंचवीस हजारापेक्षा जास्त घराचे काम एकाच वेळी सुरु आहे. ही घरे विक्री करण्याचे प्रक्रियाही एकाच वेळी राबवली जात आहे. २६ जानेवारी रोजी काही घरांची सोडत जाहीर केल्यानंतर सिडकोने आता शिल्लक आणि नवीन अशा ४ हजार १५८ घरांची सोडत जाहीर केली आहे. तीन ऑक्टोबर पर्यंत या घरांसाठी इच्छूक अर्ज करु शकणार आहेत. यातील ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव असून या घरांना अडीच लाख रुपयांचे अनुदान आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीतील ७ संचालकांच्या अपात्रेतेला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

उर्वरित ३ हजार ७५४ घरे ही सर्वसाधारण नागरीकांसाठी खुली आहेत. या घरांची किमंत कमीत कमी २१ लाख ते जास्तीत जास्त ३४ लाखापर्यंत आहे. या उलट तळोजा, कळबोली, खारघर, आणि द्रोणागिरी क्षेत्रात खासगी विकासक या क्षेत्रफळाचे घर हे जास्तीत जास्त ३९ लाख ते ६५ लाखापर्यंत विक्री करीत आहेत. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, नेरुळ उरण रेल्वे, सागरी मार्ग, न्हावा शेवा शिवडी सेतू, जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय फूटबॉल मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गोल्फ कोर्स, ऐरोसिटी, लॉजिस्टिक पार्क, असे अनेक प्रकल्प या घरांच्या आजूबाजूला आहेत किंवा प्रस्तावित आहेत. त्यामुळे सिडको प्रकल्पांच्या जोरावर जोरात विक्री करणारे खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे ग्राहकांना दहा ते पंधरा लाख रुपयांनी स्वस्त पडणार असून भविष्यात नवी मुंबईच्या विकासामुळे या घरांच्या किमंती वाढणार असल्याने घराचे पहिले स्वप्न पूर्ण करणाºया नागरीकांबरोबर गुंतवणूक करणाºया ग्राहकांचा फायदा होणार आहे. सिडकोच्या बांधकामाबद्दल यापूर्वी अनेक तक्रारी होत्या. हे बांधकामात देखील सुधारणा केली जात आहे.