काम करत असलेल्या कंपनीतून ११ लाख रुपयांचा पॅडेनियम धातू चोरी केल्या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हि कारवाई तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी मध्ये हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत डाग दागिने, आभूषण, संगणक, मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूत वापर करण्यात येणारा पॅडेनियम हा मौल्यवान धातू वापरला जातो. याच कंपनीत अनिल भालेराव नावाची व्यक्ती ३७ मार्च पासून पर्यवेक्षक पदावर काम करीत होती. मात्र हे काम करत असताना त्याने ११ लाख रुपयांचा पॅडेनियम धातू चोरी केला.
कंपनीत ठराविक दिवसांनी असलेल्या ऐवजची तपासणी केली जाते.या तपासणीत पॅडेनियम धातू जेवढा वापरला गेला तसेच इतरत्र देण्यात आला त्यापेक्षा कमी असल्याचे लक्षात आले. हि बाब संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातली.
संशयित आरोपी स्वतः उत्पादन पर्यवेक्षक असल्याने त्यांच्यावर संशय घेतला गेला नाही. मात्र सखोल तपासणी करणे, नजर ठेवणे, अशा उपायोजना केल्यानंतर अनिल भालेराव याच्या वर संशय बळावला. याबाबत हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणारे रविप्रकाश यादव यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करीत भालेराव वर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यामुळे भालेराव याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या दोन तासात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला होता.
भालेराव याच्या चौकशीत त्याने केवळ पॅडेनियम नव्हे तर रोडियम आणि रुथीनियम हे मैल्यवान धातू चोरी करून अन्यत्र विकल्याचे कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा सर्व माल जप्त केला आहे. पॅडेनियम, रोडियम आणि रुथीनियम हे मौल्यवान धातू समजले जातात. इलेक्ट्रॉन वस्तू दागिने, अत्यंत बारीक तार बनवण्यासाठी त्याचा वापर होतो.