नवी मुंबई : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि देशात काँग्रेस मध्ये आनंदाची भरती आली. नवी मुंबई काँग्रेसने हा विजय साजरा केला. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत, प्रदेश प्रवक्ता नासिर हुसेन यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून जल्लोश साजरा केला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा जयघोष करीत घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी ” हा विजय केवळ काँग्रेसचा नसून तमाम कर्नाटकी जनतेचा, लोकशाहीचा आहे.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2023 रोजी प्रकाशित
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी, कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोश
Karnataka Assembly Election 2023 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि देशात काँग्रेस मध्ये आनंदाची भरती आली.
Written by लोकसत्ता टीम
नवी मुंबई

First published on: 13-05-2023 at 20:42 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress wins in karnataka assembly elections supporters celebrate in navi mumbai ysh