नवी मुंबई : नवी मुंबईत द्रुतगतीच्या तोडीस तोड असलेल्या पाम बीच मार्गावरून जाताना उंचावर ठेवण्यात आलेल्या कारकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. सध्या ही कार झाकलेली असली तर लवकरच तिचे अनावरण होणार आहे. अपघात ग्रस्त असलेली छिन्नविछिन्न गाडी पाहून तरी वाहन चालकांना वेगावर नियंत्रण नाही ठेवले तर काय होईल याची कल्पना येईल. वेगावर नियंत्रण ठेवा अन्यथा आपलीही अवस्था अशीच होईल. नवी मुंबई मनपाने अपघात रोखण्यासाठी ही अनोखी उपाययोजना केली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नवी मुंबई महानगर पालिका अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असते. त्यात असेही उपक्रम असतात जे पालिका कामांशी निगडीत नाहीत. मात्र नवी मुंबईकरांसाठी मनपा पुढाकार घेते. असा उपक्रम म्हणजे रस्ते अपघात रोखण्यासाठी उपायोजना करणे होय. नवी मुंबईतील पाम बीच हा मार्ग एखाद्या द्रुतगती मार्गाप्रमाणे असून वाशी ते बेलापूर असा सुमारे ९ किलोमीटर इतका आहे. दुर्दैवाने या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे येथे होणारे जवळपास सर्व अपघात केवळ वेगावर नियंत्रण न राखल्याने होतात.

हेही वाचा: उरण: गारव्यात गरमागरम चविष्ट हिरव्या चण्याचा आस्वाद

त्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगर पालिकेने यापूर्वी वेग नियंत्रण दर्शिवणारी  ( Speed limit 60 ) मोठ मोठी इलेक्ट्रोनिक फलक लावले होते. नियमनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करता यावी म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा देखील लावण्यात आली होती. आता त्याहून अनोखा प्रयत्न सुरु केला असून या मार्गावरील आगरी कोळी चौकात एक अपघात ग्रस्त गाडी उंचावर लागण्यात आली आहे. जेणेकरून सहज रित्या सर्व वाहन चालकांच्या नजरेस पडावी. अत्यंत छिन्न विच्छिन्न अवस्थेतील गाडी पाहून अपघात झाल्यास आपल्या गाडीचीही अशीच स्थिती होऊ शकते आणि आपल्याला यमराज घेऊन जाऊ शकतात. असे लक्षात येते. निदान असे दृश्य पाहून तरी गाडीच्या वेगावर नियंत्रक ठेवतील अशी अपेक्षा आहे. सध्या या गाडीवर आवरण टाकले असून लवकरच समारंभपूर्वक याचे अनावरण केले जाणार आहे अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Control the speed of the drivers navi mumbai municipal corporation planned to keep the accident car on the road tmb 01
First published on: 05-12-2022 at 09:15 IST