उरण तालुक्यातील चाणजे गावात एका गाईला जुळी वासरे झाली आहेत. ही जर्सी गाय असून अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही चाणजे येथे जाऊन याची माहिती घेतली. शेतीला जोडव्यवसाय म्हणून चाणजे येथील शेतकरी हेमंत लांगी यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी देशी गाईंसह तीन जर्सी गाईही विकत घेतल्या आहेत. यातील एका जर्सी गाईने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगांची आहेत. एकाच वेळी दोन वासरे होणे ही लाखात एकच घटना असल्याचे उरणचे पशु वैद्यकीय अधिकारी अनिल धांडे यांनी सांगितले. या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी येथे झुंबड उडाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
गोमाता.. जुळ्या वासरांची!
उरण तालुक्यातील चाणजे गावात एका गाईला जुळी वासरे झाली आहेत.
Written by मंदार गुरव

First published on: 25-11-2015 at 01:15 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow twin calves in uran