नवी मुंबई : पामबीच मार्गालगत ७.५ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प वादात सापडला आहे. बहुचर्चित सायकल ट्रॅकचा वापर चक्क ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात फिरायला येणारे नागरिक व प्रेमीयुगलांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सायकल ट्रॅकचे काम बंद आहे.

सायकल ट्रॅकच्या कामाबाबत मतमतांतरे असून पालिकेने शासनाकडे सादर केलेल्या विकास आराखड्यात सायकल ट्रॅकचे विविध ठिकाणचे आरक्षणच रद्द केल्याने पामबीच मार्गालगतच्या सायकल ट्रॅकचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेचे ११.५८ कोटी रुपये पाण्यात वाया जाणार असून सध्या सायकल ट्रॅक हा पामबीच मार्गालगतचा पार्किंग ट्रॅक बनल्याचे चित्र आहे. या सायकल ट्रॅकच्या कामाची मुदतही संपत आली असून अर्धवट कामामुळे पालिकेच्या कोटी रुपयांची निव्वळ उधळपट्टी झाल्याचा आरोप पालिकेवर करण्यात येत आहे. पालिका मुख्यालयाजवळून सुरू होणाऱ्या या नियोजित सायकल ट्रॅकचे काम तुकड्या तुकड्यात होत असून सलग सायकल ट्रॅकची सुविधा शक्य नसल्याने कोटी रुपये खर्चाचा ट्रॅक वादग्रस्त ठरला आहे.

mumbai, Western Railway , Extend Harbor Line up to Borivali, Expected in Three Years, Completion Expected in Three Years , Harbor Line western railway,
पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

हेही वाचा – तोंडदेखली कारवाई? सीवूड्समध्ये काम बंदची सूचना, अन्यत्र पालिकेचे दुर्लक्षच

ट्रॅकचा मार्ग बदल, अतिक्रमण

पालिका मुख्यालयाजवळून सुरू होणारा सायकल ट्रॅक मोराज सर्कलपर्यंत प्रस्तावित होता. त्यानंतर त्यात बदल केला. सायकल ट्रॅकचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेच्या या नियोजित सायकल ट्रॅकच्या कामाची सद्यास्थिती पाहिली असता विविध ठिकाणी सिग्नल तसेच खाडी किनारा यांचा अडथळा आहे. दुसरीकडे अक्षर चौकापासून पुढे चाणक्य चौकापर्यंतच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

उच्च न्यायालयाची परवानगी नाही

सायकल ट्रॅकचे काम मे. साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्या मार्फत सुरु असून काम पूर्ण करण्याची मुदत काही महिन्यांत संपणार आहे. तसेच अद्याप हायकोर्टाची परवानगीच मिळाली नाही. असे असतानाही ६ कोटी रुपयांपर्यंतचे काम केलेच कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.