सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च संधी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांची नाराजी कायम आहे. यातून माढ्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. परंतु मोहिते-पाटील यांना एखाद्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अशा प्रसंगातून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही जावे लागले होते. १९७२ सालच्या गाजलेल्या अकलूजच्या लक्षभोजन प्रकरणामुळे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे त्यावेळी विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते.

आज ५२ वर्षांनंतरही अकलूजचे लक्षभोजन महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. शंकरराव मोहिते-पाटील हे १९५२ ते १९७२ पर्यंत माळशिरसचे आमदार होते. दोन साखर कारखान्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद अशा एक ना अनेक संस्थांचे अध्वर्यू राहिलेले शंकरराव मोहिते-पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र विजयसिंह यांचा १९७२ साली अकलूजमध्ये शाही विवाह सोहळा झाला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळाने होरपळलेला असताना इकडे अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विवाह सोहळ्यात लाखभर लोकांना भोजन देण्यात आले होते. लक्षभोजन म्हणून त्याच्या रसभरीत बातम्या प्रसिद्ध होताना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींमध्ये बर्फाच्या लाद्या टाकण्यात आल्या होत्या. मालमोटारी भरून तेंदूलपाने मागविण्यात आली होती. ट्रॅक्टरने जेवण वाढण्यात आले होते. त्याची दखल जागतिक पातळीवरील प्रख्यात माध्यमांनीही घेतली होती. यात काही गोष्टी अतिरंजित होत्या खऱ्या; परंतु लक्षभोजनावर अनेक वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठविली होती.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

काही अग्रगण्य वृत्तपत्रांनी ‘समाजवादी लक्षभोजन’ म्हणून शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्याची दखल अर्थात नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली. परिणामी त्यातूनच सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे माळशिरस विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्याऐवजी त्यांचेच सहकारी चांगोजीराव देशमुख यांना उमेदवारी दिली असता शंकरराव मोहिते-पाटील यांनी नाराज न होता उलट, चांगोजीराव देशमुख यांना चक्क बिनविरोध निवडून आणले होते. अकलूजच्या लक्षभोजनाच्या अध्यायामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांचे नाव देशभर गाजले होते.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही पुढे १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता लाटेत पाणीवचे शामराव पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घराण्याचा वारसा पुढे नेताना पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. उपमंत्रीपासून ये उपमुख्यमंत्रिपदापर्यंत वाटचाल करताना त्यांनी सुवर्णकाळ अनुभवला. परंतु २००९ नंतर त्यांची राजकीय पीछेहाट होत गेली. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडून त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले. मात्र यंदा माढा लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे पुतणे धैर्यशील यांना भाजपने तिकीट नाकारून त्यांचा हिरमोड केला आहे.

हेही वाचा – रायगडात शेकापला लागलेली गळती थांबेना

१९७२ साली लक्षभोजन प्रकरणामुळे शंकरराव मोहिते-पाटील यांचे आमदारकीचे तिकीट कापण्यात आले असता त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला विधानसभेवर बिनविरोध निवडून आणण्याची किमया सहजपणे केली होती. परंतु बदलत्या राजकीय वातावरणात याच मोहिते-पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांना भाजपने माढा लोखसभेचे तिकीट नाकारल्यानंतर मोठाच संघर्ष करावा लागत आहे.