उरण : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व अपघाताला कारणीभूत ठरणारी जड वाहने व खड्डेमुक्त मार्ग ठेवा अन्यथा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी जेएनपीए बंदर आणि उरणच्या मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.बंदराच्या कामगार वसाहतीमधील अधिकारी क्लबमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जेएनपीए बंदरावर आधारित गोदाम, सी एफ एस तसेच वाहतूकदार व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अस्थापनाचे तसेच जेएनपीए, सिडको, एन. एच. आय. व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी या अपघातासंदर्भात विविध मुद्दे मांडून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या विरोधात कारवाई आणि समन्वयाची मागणी केली. वाहतूक विभागाचे अतुल दहिफळे, जी एम मुजावर, नितीन बडगुजर तर जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, प्रमोद ठाकूर, संदेश ठाकूर आदी उपस्थित होतेयावेळी काकडे यांनी उरण आणि जेएनपीए बंदर परिसरातील रस्ते खड्डे आणि वाहनमुक्त राहावेत यासाठी वाहतूक विभागाने तीन अधिकारी व १५ जादा अंमलदारांची नेमणूक केली आहे. तर वाहतूक आणि गोदाम मालकांनी आवश्यक त्या वेळेत वाहने मागवावी,विनाकारण वाहने रस्त्यावर उभी केल्यास आशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल त्यासाठी उपाययोजना लागू करा अन्यथा कारवाई केली जाईल, अपघात होऊ नये यासाठी सहकार्य करावे सेवा मार्गावर कंटेनर वाहन बंद पडल्यास ते त्वरित हटविण्यात यावा वाहतूक कोंडी, उरण न्हावा शेवा आणि गव्हाण फाटा या तिन्ही वाहतुकीला अडथळा येणाऱ्या ११२ या क्रमांकावर संपर्क करावा.

वाहतूकदारांनी जड वाहने डाव्या बाजूनेच चालवावीत याचे पालन करण्यात यावी. वाहतूक विभागाने लेन कटिंग केसेस कराव्यात चालकांनी नियम न पाल्यास कारवाई करणार तसेच मार्गावरील दिशादर्शक फलक, वेगाने वाहने हाकणाऱ्यावर कारवाई करणार, मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी एनएचआय, एमएसआरडीसी ,पट्टे आखून घाव्यात पुलावर ओव्हरटेक करू नका, दास्तान, धुतुम येथील अवैध वाहनतळ जेएनपीएने आवश्यकतेनुसार वाहनेच मार्गावर आली पाहिजे. क्षमतेच्या अधिक वाहने येऊ नयेत याची दक्षता घ्यावी इमर्जन्सी वाहनाना अडथळा नाही. जेएनपीए ते सर्व मार्गावरील गूगल मॅपिंग केले जात आहे.

सीएफएसएम टी यार्ड गोडावून यांनी शिपाई नेमण्यात यावे अशी सूचना अनावश्यक गतिरोधक हटविण्यात यावेत. उड्डाणपुलावर संकेत दिवे बसविण्यात यावेत. गोडाऊनच्या बाहेरील मार्गावर वाहने उभी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. संदेश देणाऱ्या चार वाहतूक पोलीस वाहनांचा वापर करण्यात यावा. उरण शहर परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येणार आहे.

जनतेला आवाहन

जेएनपीए किंवा उरण परिसरातील मार्गावरील वाहतूक कोंडी, उभी वाहने तसेच खड्डे याची माहिती वाहतूक विभागाला माहिती देण्यासाठी वाहतूक विभागाने ८६५५३५४१३६ हा भ्रमणध्वनी जाहीर केला आहे. यावर छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.