लोकसत्ता टीम

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात रमजान ईद निमित्त फळांना अधिक मागणी असल्याने फळांची आवकही वाढत आहे. विशेषतः कलिंगड़ , आंबा, पपई, खरबूज यांना जास्त मागणी असते.

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़. उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असून, बाजारपेठेत रेलचेल आहे़. गेल्या काही दिवसांपासून फळांची आवक वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मागणी वाढल्याने फळ बाजारात सर्व फळांमध्ये कलिंगडची जास्त आवक झाली आहे.

आणखी वाचा- बाजारात भाज्यांची दरवाढ

कलिंगड, खरबूज, पपईच्या १००गाड्या दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून ५०गाड्या अधिक दाखल होत आहेत. हापूस ३७४६क्विंटल , इतर आंबा ६०१०क्विंटल दाखल झाले आहे. कलिंगड ८०५०क्विंटल आवक असून प्रति क्विंटल ६००-१२००रुपये , द्राक्ष १०८१ क्विंटल दाखल झाले असून ३५००-५५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत. पपई १९७४ क्विंटल आवक असून प्रति क्विंटल १५००-३०००रुपये तर खरबूज २६३५क्विंटल दाखल झाले असून झाली २०००-२४००रुपये दर आहेत.