नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झालेले बेदाणे लिलाव केंद्र, सुका मेवा बाजारपेठ वाढवली तर ती शेतकऱ्यांसहित इतर बाजार घटकांच्या हिताची ठरेल शिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात पहिल्यांदाच बेदाणा लिलावकेंद्राचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ आधी  मुंबईमध्ये स्थित होती. कालांतराने बाजारपेठेचे व्यापकता वाढवण्यासाठी नवी मुंबईत स्थलांतर करण्यात आले, तेव्हापासून आतापर्यंत एपीएमसी बाजार समितीची वार्षिक उलाढाल वाढत आहे , असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. सुकामेव्याच्या माध्यमातून बेदाण्याला बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल. याकरिता सांगली, सोलापूर सहित आता शेतकऱ्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणे विक्रीसाठी आणण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या बाजारात सुक्यामेव्याची ३०० दुकाने आहेत, आता याठिकाणी बेदाण्याचे लिलावकेंद्र सुरू झाल्याने आणखी  दुकाने वाढतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : केळी महागली, निर्यात वाढली, उत्पादनातही घट; केळी दरात वाढ

शेतकऱ्यांना बेदाण्याला चांगलं हमीभाव मिळण्याची आशा

राज्यातून सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची उत्पादन घेतले जाते. शिवाय येथील शेतकरी त्यावर प्रक्रिया करून बेदाणे तयार करतात. या शेतकऱ्यांना सध्या सोलापूर आणि सांगली या ठिकाणी बेदण्याची थेट विक्री करण्याची मुभा होती. परंतु आज गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाण्याचे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेदाण्याच्या विक्रीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात बेदाण्याला २०० रुपयापासून बोली लावण्यात आली ते अखेर ३५१ पर्यंत बोली लावली गेली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव केंद्र सुरू झाल्याने या ठिकाणी आमच्या मालाला योग्य दर मिळेल अशी अपेक्षा आहे, असे मत शेतकरी विशाल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला सोलापूर बाजारात बेदाण्याला २००-२७५रुपये बाजारभाव मिळतो. परंतु आज झालेल्या लिलावात ३५१ रुपये दर मिळाला आहे. यापुढेही  मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत बेदाण्याला योग्य बाजारभाव मिळेल अशी -आशा आहे.

-राहुल हरिदास पवार, पंढरपूर