नवी मुंबई. : नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड अर्थात क्षेपणभूमीला आग लागली. सुरवातीला अग्निरोधक यंत्रणा वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकच जास्त झाल्यावर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.  आज रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या बाबत क्षेपन भूमीच्या सुरक्षारक्षकाने वाशी अग्निशमन केंद्राला ही माहिती देताच सदर ठिकाणी अग्निशमन दल दाखल झाले. तो पर्यंत आसपास धुराचे लोट उडाल्याने परिसरात धुराचे साम्राज्य झाले होते. त्यात क्षेपणभूमीला आग लागल्याने उग्र दर्प सर्वत्र पसरला होता . अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री पावणे बाराच्या आसपास आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आग धुमसत असल्याने कुलिंगचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली.