पनवेल ः खांदेश्वर वसाहतीमध्ये एका आठ वर्षाच्या बालकावर अत्याचार झाला आहे. इमारतीचा पत्ता सांगण्याच्या बहाण्याने घरापासून लांब घेऊन जाऊन इमारतीच्या छतावर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली असून पोलीसांनी तातडीने संशयीत आरोपीला अटक केली. आठ वर्षीय बालक खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ९ च्या परिसरात राहतो.

३८ वर्षीय सनाऊल शेख याने अथर्व इमारतीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या बालकाला बोलण्यात गुंतवले. या बालकाचा विश्वास संपादन करुन सनाऊल बालकाला अथर्व इमारतीच्या छतावर घेऊन गेला. त्याने तेथे बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर बालकाने पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर पालकांना धक्काच बसला. पालकांनी बालकाला घेऊन थेट पोलीसांत धाव घेतली. सनाऊल हा मुंबई येथील मसजीद बंदर येथे राहणारा आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight year old child molested in khandeshwar panvel amy
First published on: 27-02-2024 at 15:17 IST