उरणमधल्या खोपटे व पागोटे येथील पाणथळ क्षेत्रांवर भराव घालून तेथील खारफुटी नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे येथील जैवविविधता ही धोक्यात आली आहे. या विरोधात पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणवाद्यांनी या भरावावर उभारल्या जाणा-या कंटेनर्सच्या पार्किंग लॉटविरुध्द आवाज उठवला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू; आज संध्याकाळी अंतिम लढत

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने एक ईमेल पाठवला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिका-यांना याचे निर्देश दिले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी आणि पाणथळ क्षेत्र समित्यांचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुध्दा नॅटकनेक्टने स्वतंत्र तक्रार केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एमआयएम निवडणुकीसाठी सुसज्ज आयटी सेल उभारणार; प्रसंगी समविचारी पक्षांशी करणार युती

येथील १५० मीटर लांब आणि १५ मीटर रुंदीचा पट्ट्याला अवैधरित्या बुजवले गेले आहे. पार्किंगसाठी असे भराव टाकणे त्याचप्रमाणे अवैधपणे पैसे गोळा करण्यासाठी स्थानिक माफिया कार्यरत असल्याचे महाराष्ट्र लघु पातळी पारंपारिक मच्छिमार कामगार युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार सांगितले.
अशाच पध्दतीने धुतुम येथे खारफुटीच्या मोठ्या पट्ट्याला बुजवून त्यावर पार्किंग लॉट बनवला आहे. या संदर्भात पर्यावरणवादी आणि स्थानिक मच्छिमारांनी वारंवार खारफुटींच्या नाशाविरुध्द, होणा-या गुन्ह्यांविरुध्द ऍलर्ट देऊन देखील क्षेत्रातील निरीक्षण यंत्रणा निष्फळ ठरत असल्याची खंत बी.एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समित्यांच्या नियमित बैठका होत नसल्यामुळे आशा उल्लंघन करणा-या व्यक्तींना आणखीन खतपाणी मिळत आहे, कारण त्यांच्यावर कोणाचाही चाप राहिलेला नाही.

हेही वाचा- रायगड : द्रोणागिरी डोंगराला पुन्हा वणवा; वणवा की लावलेली आग?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोपटे आणि पागोटे आंतरभरती क्षेत्रांना तात्काळ पाणथळ क्षेत्रे सूचित करुन, जैवविविधता व मच्छिमार समाजाच्या हितासाठी त्यांचे जतन केले पाहिजे असेही मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे.