निर्बीजीकरण करूनही नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर झाला असून सर्वच विभागांत कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्री ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या दिसतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर हे कुत्रे धावून जातात. गेल्या ९ वर्षांमध्ये तब्बल १ लाख ५ हजार ९४९ जणांना श्वानदंश झाला आहे. प्रत्येक महिन्यात अशा ८०० ते ९०० घटना घडत आहेत.
नवी मुंबईत रेल्वे स्थानके, बसस्थानके, बाजार, पादचारी पूल, कचराकुंडय़ा अशा सर्वच ठिकाणी कुत्र्यांच्या टोळया वावरताना दिसतात. नवी मुंबई महानगरपालिकेचे भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. या मुद्दय़ावर महासेभत व स्थायी समितीच्या सभेत चर्चा होते आणि ती हवेतच विरते. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे कर्तव्य बजावल्याचे समाधान पालिका आधिकाऱ्यांना मिळते.
महानगरपालिका श्वान नियंत्रण कार्यक्रम राबवत आहे. पंरतु यासाठी सुसज्ज केंद्रच नाही. पूर्वी कोपरीजवळ कार्यालय होते. ती वास्तू धाकोदायक झाल्यांनतर तात्पुरत्या स्वरूपात तुभ्रे येथील कचराभूमीवर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला किमान १ हजार श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होणे आवश्यक असता प्रत्यक्षात ३५० ते ४५० शस्त्रक्रिया होतात. परिणामी शहारातील श्वांनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री ११ नंतर रस्त्यावरून पायी जाणे जवळपास अशक्य झाले आहे. कुत्रे वाहनांचाही पाठलाग करतात. यामुळे अनेकदा मोटारसायकलस्वारांचे अपघात झाले आहेत. लहान मुलांना श्वानदंश होण्याचे प्रमाण मोठे आहे. मुले खेळत असताना कुत्रे पाठलाग करून त्यांना चावा घेतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल २००८ पासून नोव्हेंबर २०१६पर्यंत
पालिका पारसिक हिल, आम्रपाली पुलाखालील जागेत निर्बीजीकरण केंद्र उभारणार आहे. यासंदर्भात सिडकोशी देखील पत्रव्यवहार करण्यात येत आहे. ही जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा
रात्री कोपरखरणे रेल्वे स्थानकावरून तीन टाकीकडे जाताना कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्यांची टोळकी अंगावर येतात. म्हणून नाईलाजास्तव १५ मिनिटांच्या रस्त्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागतो.
– अर्जुन भोसले, नागरिक
पंचवार्षिक श्वानगणना २०१२
वॉर्डचे नाव भटके कुत्रे
बेलापूर ३५२६
नेरुळ ३०३९
वाशी ३६२३
तुभ्रे ३१८९
कोपरखरणे ५९२५
घणसोली ३६७९
ऐरोली ३४८४
दिघा ३३९९
एकूण २९८६४

