scorecardresearch

Premium

पनवेल: मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या संचालकांवर मॉर्निंग वॉक करताना जीवघेणा हल्ला

तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांवर लाकडी दांडक्याने रोडपाली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयालयालगत पहाटे दोन मारेक-यांनी दोन दिवसांपूर्वी जिवघेणा हल्ला केला.

attack, Fatal attack on director of Mumbai Waste Management
पनवेल: मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या संचालकांवर मॉर्निंग वॉक करताना जीवघेणा हल्ला

पनवेल: तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांवर लाकडी दांडक्याने रोडपाली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयालयालगत पहाटे दोन मारेक-यांनी दोन दिवसांपूर्वी जिवघेणा हल्ला केला. हल्लेखोर मोटारीतून आले होते. या घटनेबाबत रितसर गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या हल्यात जखमी संचालक बचावले असले तरी त्यांच्या पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर उपचार सूरु आहेत. हल्ला नेमका कोणी व का केला याचा शोध पोलीस लावू शकले नसले तरी कंपनीतील अंतर्गत वादावरुन ही मारहाण झाल्याचे समजते. या घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काम करणा-या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिका-यांच्या सूरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही कंपनी टाकाऊ रसायनांचे व्यवस्थापन करते. तळोजामधील या कंपनीत मुंबई व उपनगरांमधील जैविक आणि रासायिनक कचरा विघटनासाठी पाठविला जातो. या कंपनीचे संचालक रोडपाली येथे राहतात. ते दोन दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉक करताना त्यांना पोलीस मुख्यालयाशेजारील सेवा रस्त्यावर मारेक-यांनी गाठले. मारेकरी मोटारीतून आले होते. एका मारेक-याने लाकडी दांडका गाडीतून काढला आणि संचालकांना मारहाण सूरु केली. काही समजण्याआत हे सर्व घडल्याने रक्तबंबाळ झालेले मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात गेले.

aero modeling show pune, aero modeling show organized in pune
पुणे : रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके
farmers climbed the tower and protested
अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची टॉवर वर चढून ‘गांधीगिरी’
navimumbai municipal corporation
‘इंडियन स्वच्छता लीग २’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे ३ ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’
Etihad Airways
एतिहाद एअरवेजकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती, कंपनीचा भारतीय बाजारपेठेत पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

हेही वाचा >>>मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडे ते रोडपाली वाहतूक कोंडी

त्यानंतर त्यांना हाड मोडल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगीतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील हाडांचे उपचार करणा-या डॉक्टरांकडे दाखल करावे लागले. पनवेलचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थानिक कळंबोली पोलीसांना दिले असून या घटनेतील संशयीत आरोपींना शोधण्यासाठी पोलीसांचे पथक काम करत असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fatal attack on director of mumbai waste management during morning walk amy

First published on: 23-09-2023 at 20:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×